सावंतवाडी: तालुक्यातील आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाचा सुमारे २५ कोटी रुपयांचा प्रकल्प हवाई पाहणी करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही का असा प्रश्न माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. आंबोली मधे १७ वर्ष पूर्वी उभा राहिलेल्या पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प अद्याप उद्घाटना विना सडत पडलेला आहे. मागील १७ वर्षात याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. अधिकारी डोळ्याला झापडे लावून मुग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी या प्रकल्पावर भेट देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.