Home जागतिक घडामोडी फ्रान्समधील भारताच्या वाणिज्य दूतावासाबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

फ्रान्समधील भारताच्या वाणिज्य दूतावासाबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

220

१५ जुलै,पॅरिस वार्ता: भारत आणि फ्रान्समधील लोकांचे दीर्घकाळापासून घनिष्ट संबंध आहेत, असे सांगून ‘मार्सेल’ या शहरामध्ये भारत नवीन वाणिज्य दूतावास सुरू करणार असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. फ्रान्समधील ‘मार्सेली’ शहरात भारत नवा वाणिज्य दूतावास उघडणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली. फ्रान्सच्या दौऱ्यादरम्यान ही पत्रकार परिषद झाली.

मोदी म्हणाले, “आम्ही फ्रेंच विद्यापीठांना त्यांच्या शाखा भारतात उघडण्यासाठी आमंत्रित करतो. दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयात फ्रान्स भागीदार आहे.” फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दीर्घकालीन व्हिसा देण्याच्या फ्रान्सच्या निर्णयाचेही मोदींनी स्वागत केले.

आगामी पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळांबाबत मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, की भारतीय खेळाडू ऑलिंपिकमध्ये होणाऱ्या खेळांबाबत खूप उत्सुक आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या पथकाला ऑलिंपिक खेळांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मोदी यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.