Home राजकारण फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा ! संजय राऊत…

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा ! संजय राऊत…

36

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होत आहे. दरम्यान काँग्रेसनं निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा समावेश आहे. या शिवाय, आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काल अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. देशात कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण ‘लाईव्ह ब्लाॅग’च्या माध्यमातून घेणार आहोत.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला हवा संजय राऊतांची मागणीमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला. फडणवीस विरोधी पक्षात असते तर नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा. या 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.