Home राजकारण फडणवीसांना ७ वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी करून दिली...

फडणवीसांना ७ वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी करून दिली आठवण

68

सध्या राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळत आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात आज २०२३-२४ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी वर्ग, अंगणवाडी सेविका, महिला, शिक्षण क्षेत्र अशा विविध बाबींसाठी तरतूद केल्याची घोषणा फडणवीसांनी केली. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ सादर केल्यानंतर त्यावर आता विरोधकांनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांनीच मुख्यमंत्री असताना सात वर्षांपूर्वी केलेल्या एका घोषणेची आठवण करून दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?“चुनावी जुमला, दृरदृष्टीचा अभाव असा हा अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ असा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात आमच्या पंचसूत्रीप्रमाणे बऱ्याच बाबी मागच्या अर्थसंकल्पात होत्या. हिंजेवाडी शिवाजीनगर मेट्रो, रिंगरोड, रेवस ते रेड्डी हा मार्ग असेल किंवा विरार ते रायगड, स्वारगेट ते कात्रज, निगडी ते पिंपरी यावर पुन्हा घोषणा करण्यात आल्या आहेत. पुरंदरचं विमानतळ आम्ही करणार अशी घोषणा केली. पण काय करणार? ते सांगितलं नाही. “कल्याण-डोंबिवलीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेसहा हजार कोटींची घोषणा केली होती. त्यातली एक दमडीही आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्याचप्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना शेतपंपाच्या वीजमाफीची घोषणा त्यांनीच केली होती. पण त्याचा साधा उल्लेखही नाही. असं विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.