सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण (33 ) यांनी गुरुवारी रात्री आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली होती. त्यानंतर सौ. प्रिया चव्हाण या ३३ वर्षीय नवविवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान पाणीपुरवठा सभापती प्रणाली मिलिंद माने (४२) व त्यांचा मुलगा आर्य मिलिंद माने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रणाली माने या नात्याने प्रियाच्या नणंद आहेत. प्रिया हिच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी तिचे वडील, भाऊ, बहिणी आदी नातेवाईकांनी रविवारी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली. प्रिया चव्हाण हिच्या आत्महत्येला प्रणाली माने व त्यांचा मुलगा जबाबदार असल्याची तक्रार करत तसा जबाब प्रिया हिचे वडील विलास शंकर तावडे (रा. कलंबिस्त, ता. सावंतवाडी) यांनी नोंदविला. त्यानुसार प्रिया हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Home क्राईम प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांच्यावर गुन्हा दाखल?