Home स्टोरी प्रांजल आणि नंदिनी आंबेरकर यांचे स्पर्धा परीक्षेत यश!

प्रांजल आणि नंदिनी आंबेरकर यांचे स्पर्धा परीक्षेत यश!

85

मसुरे प्रतिनिधी: सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेमधे जिल्हा परिषद शाळा मसुरे कावा ची विद्यार्थिनी कु.प्रांजल अरुण आंबेरकर हीने जिल्ह्यास्तरावर नववा क्रमांक व मालवण तालुक्यात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.

तसेच प्राथमिक शिक्षक समिती आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधील नंदिनी अरुण आंबेरकर ही मसुरे बिट स्तरावर प्रथम व तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.शिक्षक भारती संघटना आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये सुद्धा नंदिनी ही मसुरे बिट स्तरावर प्रथम व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत आली आहे.प्राथमिक शिक्षक संघामार्फत द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड परीक्षेमध्ये नंदिनी ही तालुक्यात सातवी आली आहे. दोघीही भगिनींना मुख्याध्यापिका सौ सुखदा मेहेंदळे व सुहास गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा समिती अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर आणि उपाध्यक्ष सौ. सावली कातवणकर यांनी अभिनंदन केले.