Home क्राईम प्रसिद्ध फुटबॉलपटू ‘बेंजामिन मेंडी’वर एकूण आठ बलात्काराचे आरोप!

प्रसिद्ध फुटबॉलपटू ‘बेंजामिन मेंडी’वर एकूण आठ बलात्काराचे आरोप!

95

२ जुलै वार्ता: प्रसिद्ध फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी हा असून तो मॅनटेस्टर सिटीकडून खेळतो. बेंजामिन मेंडीवर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न असा दुहेरी खटला सुरु आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार तब्बल १० हजार महिलांबरोबर सेक्स केल्याचा दावा बेंजामिन मेंडीने केला आहे. बेंजामिन मेंडवर २०२० मध्ये मोट्रम सेंट एंड्रयू, चेशायरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर एका तरुणीवर बलात्कार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. २०१८ मध्ये विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा तो खेळाडू आहे. बेंजामिन मॅचेंस्टर सिटीसाठी तब्बल ७५ सामने खेळला आहे. त्याआधी मेंडी अंडर- १६, अंडर-१७ संघाकडून खेळला आहे. अंडर-१७ संघातून खेळताना फ्रान्सने विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती. २६ ऑगस्ट २०२१ मध्ये मेंडीवर बलात्काराचे चार आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.

२०२० ते २०२१ या काळात १६ वर्षाखालील तीन अल्पवयीन मुलींनी त्याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार केली. या आरोपांचा इन्कार करत त्याने जामीनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला. यानंतर मॅंचेस्टर सिटीने क्लबने त्याचं निलंबन केलं. २०२२ मध्ये त्याला काही अटीशर्तींवर जामीन देण्यात आला. त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आणि त्याला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली. मेंडीवर एकूण आठ बलात्काराचे आरोप करण्यात आले. याशिवाय बलात्काराच्या प्रयत्नाचं एक प्रयत्न आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले.