Home स्टोरी प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या ! स्थानिक अधिकार्‍यांकडून शाळांना आदेश !

प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या ! स्थानिक अधिकार्‍यांकडून शाळांना आदेश !

119

मुंबई: महाराष्ट्रात एकूण १ कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानंतर ‘प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या’, असा आदेश स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांनी शाळांसाठी काढला आहे. केंद्राच्या ‘नव भारत साक्षरता अभियाना’नुसार देशभरात वर्ष २०२७ पर्यंत ५ कोटी नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी १२ लाख ४० सहस्र नागरिकांना महाराष्ट्राला साक्षर करायचे आहे.

 

शिक्षकांना या सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी राज्यातील बहुतांश जिल्हा मुख्याध्यापक संघटनांनी मुख्याध्यापक महामंडळाकडे केली आहे. ती मान्य न झाल्यास सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याची चेतावणी देण्यात आली आहे.