Home स्टोरी प्रकाश सिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

प्रकाश सिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

46

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी २५ एप्रिल रोजी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. केंद्र सरकारने प्रकाश सिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे.

प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शिख कुटुंबात झाला. प्रकाश सिंग बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचेही निधन झाले आहे.