Home क्राईम पोलीस कोठडीत रचण्यात आला पती आणि दीर यांच्या हत्येचा कट!अतिक याच्या पत्नीचे...

पोलीस कोठडीत रचण्यात आला पती आणि दीर यांच्या हत्येचा कट!अतिक याच्या पत्नीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून केला दावा

70

पोलिसांच्या कह्यात असतांना हत्या करण्यात आलेले कुख्यात गुंड अतिक अहमद आणि अश्रफ यांच्या प्रकरणी अतिक याची पत्नी शाईस्ता हिने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सार्वजनिक झाले आहे. यात, ‘अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचा कट ते पोलीस कोठडीत असतांनाच रचला गेला. यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा सहभाग आहे. तपासणीच्या बहाण्याने दोघांना बाहेर काढले जाईल आणि त्यांची हत्या केली जाईल’, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे उमेश पाल हत्येच्या प्रकरणानंतर अतिकची पत्नी शाईस्ता पसार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.