Home स्टोरी पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

51

काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वेहिकल्सच्या चार्जिंग आणि आव्हानाबाबत बोलत होते, पण आता वेळ बदलली आहे. इलेक्ट्रिक वेहिकल्सचा बाजार खुला झाला आहे. आता लोकांना ई-वेहिकल्स विकत घेण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहावं लागतंय. आता तुम्हाला वाहन विकत घ्यायचं असेल तर पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या, असं आवाहन गडकरींनी केलं आहे. शेतकरी आता फक्त अन्नदाता नाही तर उर्जादाताही आहे. फ्लेक्स इंजिन कारमध्ये शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉलचा प्रयोग होऊ शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले, तसंच नागरिकांनी पार्किंगसाठी रस्त्यांचा उपयोग करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.’दिल्लीला पॉल्युशन फ्री करणं माझं लक्ष्य आहे. मी जेव्हा जल संसाधन मंत्री होतो तेव्हा जल प्रदुषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारला 6 हजार कोटी रुपये दिले होते. आता वायू आणि ध्वनी प्रदुषणाचा सामना करायचा आहे. माझं पहिलं टार्गेट दिल्लीमध्ये तीनही प्रकारचं प्रदूषण संपवणं आहे,’ असं वक्तव्य गडकरींनी केलं.