Home स्टोरी पूणे लिंक रोड च्या रुंदीकरणात बाधीत असलेल्या धोकादायक इमारतीवर निष्कासनाई कारवाई करण्याचे...

पूणे लिंक रोड च्या रुंदीकरणात बाधीत असलेल्या धोकादायक इमारतीवर निष्कासनाई कारवाई करण्याचे टाळून पालिकेने दिली चक्क दुरुस्त करण्याची परवानगी !

120

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड ): – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात मंजूर असलेल्या कल्याण पूर्वेतील सुमारे २५ मिटर रुंदी असलेल्या पूणे लिंक रोडच्या रुंदीकरणात बाधीत असलेल्या आणि भविष्यात केव्हाही निष्कासनाची कारवाईची टांगती तलवार असलेल्या इमारतीला महापालिकेने चक्क दुरुस्तीची परवानगी दिली आहे . महापालिकेच्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांत पालिकेच्या या कारभाराविषयी संशय व्यक्त केला जात असून या बाबत प्रकाराबाबत नागरीकांत उलट – सुलट चर्चेला उधाण आले आहे .सन २०१० साली पूणे लिंक रोडच्या २५ मिटर रुंदीसाठी रोडच्या दोन्ही बाजुची दुकान आणि निवासी घरे – इमारतीवर निष्कासनाच्या कारवाईसाठी बाधीत अस्थापना मालक आणि निवासी घरे इमारती मालकांना नोटीसा बजावल्या होत्या परंतु जो पर्यंत बाधीतांचे पुनर्वसन होत नाही कींवा नुकसान भरपाई मिळणार नाही तो पण तोडक कारवाईला बाधितांनी कडाडून विरोध करीत या बाबतची याचिका मा . न्यायालयात दाखल करण्यात आली होती . या साठी कल्याण पूर्व संघर्ष कृती समितीची स्थापना करण्यात येऊन या समितीच्या माध्यमातून मा . न्यायालयात तोडक कारवाई विरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती परंतु सदर च्या दाव्याचा निर्णय सन २०१३ साली महापालिकेच्या बाजुने लागल्याने महापालिकेच्या तद्कालिन अधिकार्‍यांनी सुडबुद्धी पोटी ज्यांनी संघर्ष कृती समितीची स्थापना केली त्यांच्याच अस्थापना आणि घरे तसेच या संघर्ष कृती समितीच्या ज्या हॉटेल मध्ये बैठका होत त्या हॉटेल प्रसादवर पहिला जेसीबी चालवत रस्ता रुंदीकरणाला धडाक्यात सुरुवात केली होती . त्या वेळी सुचका नाका ते श्रीराम टॉकीज या दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या अनेक दुकान गाळ्यांवर आणि निवासी घरांवर कसल्याही प्रकारचा मोबदला न देता सुमारे ३ ते ४ महिने निर्दयपणे महापालिकेने तोडक कारवाई सुरु ठेवली होती . परंतु या कारवाई दरम्यान रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या ४ ते ५ इमारतींना अप्रत्यक्षपणे संरक्षण देऊन या इमारती कारवाई पासुन अलिप्त ठेवल्या होत्या त्या आजतागायत कायम आहेत . याच इमारतींपैकी तिसगांव नाक्यावरील गोरक्षनाथ मंदीरासमोरील ४ मजली इमारतीच्या तळमजल्या खालुन पुणे लिंक रोडच्या निर्माणाधीन १ मिटर बाय १ मिटर बॉक्स टाईप गटाराची निर्मिर्ती करून या इमारतीलाही तोडक कारवाई पासुन तेव्हा पासून आज पर्यंत दूर ठेवण्यात आले आहे . वास्तविक पहाता सन २०१३ साली इमारतीच्या खालुन गटाराची निर्मिती करतांनाच या इमारतीचा पाया ढिसूळ झाल्याने इमारत धोकादायक झाल्याचे तज्ञांचे मत असून तेव्हा पासून आज पर्यंत या इमारतीचे सुमारे २५ ते ४० टक्के बांधकाम धोकादाय झाल्याचे दिसून येत असतांना आणि पिलर्सलाही तडे गेल्याचे दिसत असतांना या इमारतीचा धोकादाक इमारतीच्या यादीत समावेश का करण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे . याच इमारतीला आता दुरुस्ती करण्याचा अधिकृतपणे परवाना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .उल्लेखनिय बाब म्हणजे या इमारती मधील सदनिका धारकांनी इमारतीचे खाजगी स्वरूपात ट्रक्श्चर ऑडीट करून त्या बाबतचा अहवाल महापालिकेला सादर करून इमारत धोकादायक झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे . परंतु सदर इमारत ही रस्ता रुंदीकरणात बाधीत असतांना आणि धोकादायक झाल्याचा खाजगी का होईना पण अहवाल प्राप्त झाला असतांनाही ही इमारत त्वरीत निष्कासित करून पूर्वनियोजित रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असतांना मात्र या इमारतीला अधिकृतपणे दुरुस्तीची परवानगी देऊन पूर्ण इमारतच अधिकृत करण्याचा घाट घातला जात असल्याची सुज्ञ नागरीकांत चर्चा ऐकू येत आहे .

इमारतीचे ट्रश्चर ऑडीट चा अहवाल प्राप्त झाल्याने दुरुस्तीची परवानगी देण्यात आली आहे . पालिकेच्या नगर रचना विभागाकडून इमारत निष्कासनाचा कधीही आदेश आल्यास इमारत निष्कासनाची कारवाई करण्यात येईल .

सौ सविता हिले : सहाय्यक आयुक्त,प्रभाग ४ जे, कल्याण पूर्वकल्याण डोंबिवली महापालिका