Home राजकारण पुन्हा एकदा अजित दादांनी मारला डोळा राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

पुन्हा एकदा अजित दादांनी मारला डोळा राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

159

१६ जुलै, नाशिक वार्ता: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला. अजित पवारांनी का मारला पुन्हा डोळा याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यापूर्वी अजितदादा विरोधी पक्षनेते असताना विधिमंडळात पत्रकारांशी बोलत असताना, उध्दव ठाकरे आले होते, त्यावेळी पवारांनी डोळा मारला होता, दरम्यान आज पुन्हा पत्रकार परिषदेत अजित पवारांनी डोळा मारल्याने त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा सुरूआहे.

उद्धव ठाकरे समोर असताना अजितदादांनी डोळा मारल्यामुळे बरीच चर्चा झाली होती. तेव्हा अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ‘माझं त्या दिवशी पोडियमवर बोलणं झालं होतं. त्यावेळी पाठीमागून कुणी तरी सांगितलं, उद्धव ठाकरे आले आहेत. त्यामुळे मी बाजूला झालो. त्यावेळी मी एक डोळा मारला. त्याच्यात काय झालं? एक पत्रकार मित्र मला एकच प्रश्न आहे, तो विचारू द्या, असं म्हणत होता, मी त्याला म्हटलं थांब रे, साहेबांचं होऊ दे मग मी बोलतो. असं ते झालं होतं. बोलताना थांब म्हणण्याऐवजी, डोळा मारला. आता त्या व्हिडीओचा एवढा गाजावाजा केला की, अजितदादांनी डोळा का मारला, अशा प्रकारची चर्चा रंगली. त्याला अर्थच नाही, असा खुलासा अजित पवारांनी त्यावेळी केला होता.