Home स्टोरी पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी...

पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड!

331

२६ जुलै वार्ता: कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दोन्ही आतंकवाद्यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना सत्र न्यायाधीश एस्.व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघेही इसिसच्या अल् सुफा संघटनेशी संबंधित असून त्यांचा देशविघातक कारवाई करण्याचा उद्देश होता. ४३६ पानांचा अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. आतंकवादविरोधी पथकाने दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतल्यावर विविध वस्तू सापडल्या. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे ‘एक्सप्लोसिव्ह वेफर डिटेक्टर’मध्ये स्पष्ट झाले, तसेच पोलिसांच्या ‘डॉग स्कॉड’नेही यासंबंधी ‘पॉझिटिव्ह रिपोर्ट’ दिला आहे. ही पावडर नेमकी कोणती स्फोटके आहेत ?, यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवली असून त्याचा अहवाल येणे शेष आहे.इम्रान खान आणि महमंद साकी हे २ आतंकवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चा कुख्यात आतंकवादी, तसेच वर्ष २०१६ मध्ये मदिनामधील आत्मघातकी बाँबस्फोटात मृत्यू झालेला कमांडर फैयाज काग्झी याचे समर्थक होते, असे पोलिसांनी जप्त केलेल्या भ्रमणसंगणकातील (लॅपटॉपमदील) माहितीवरून उघड झाले. काग्झी हा महाराष्ट्रासह देशातील विविध देशविघातक कृत्यांत सहभागी होता.काग्झी गुजरात दंगलीचे ‘व्हिडिओ’ दाखवून तरुणांना कट्टरपंथी बनवत होता. एल्.ई.टी.मध्ये सहभागी असलेला काग्झी याची वर्ष २००६ चे संभाजीनगर शस्त्रसाठा प्रकरण, पुण्यातील वर्ष २०१० चा जर्मन बेकरी आणि तेथीलच जे.एम्. रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, यांत महत्त्वाची भूमिका होती. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील आतंकवादी अबू जुंदालसह भारतातून आतंकवाद्यांची भरती त्याने केली होती. ‘इंडियन मुजाहिदीन’चा संस्थापक यासीन भटकळ याच्या तो संपर्कात होता.