Home स्टोरी पुण्यातील ९ व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी

पुण्यातील ९ व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी

39

पुणे: ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी पुण्यातील विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया आणि इतर सहा व्यवसायिकांच्या घरी आणि कार्यालयात ईडीने छापेमारी केली आहे. पुण्यातील एकूण ९ व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी सुरू करून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. सिंहगड रोड आणि शिवाजी नगर परिसरात हे ९ व्यावसायिक राहतात. तिथेच त्यांची कार्यालयेही आहेत. ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली, तिथे सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत सोडण्यात येत नाहीये. तसेच आतील लोकांना बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कुणालाही फोन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. काल पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने छापेमारी केली होती. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले होते. या प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती.