पुणे: येथील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ किलो ७५ ग्रॅमचे मॅफिड्रीन अमली पदार्थ जप्त केले. या मॅफिड्रीनचे मूल्य अनुमाने २ कोटी रुपये आहे. अमली पदार्थ विक्रीचे हे मोठ्या स्तरावरील जाळे असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी त्याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. रुग्णालयात भरती असतांनासुद्धा त्याने हे जाळे कसे चालवले ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.