४ जुलै वार्ता: पालघरमधील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील रवीना इंडस्ट्रीज पाठीमागे असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत तीन जण गंभीर भाजले असून त्यांना बोईसरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केमिकल कारखान्यांमध्ये टँकर शिरल्यानंतर एका सिक्युरिटी गार्डने स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाला आहे. केमिकल कंपनीत जेव्हा मोठा ब्लास्ट झाला तेव्हा जवळपास सहा ते सात किलोमीटर परिसरामध्ये हादरे बसल्याची माहिती मिळत आहे. भीषण आग असल्यामुळे आजूबाजूच्या कंपन्यांना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.