Home राजकारण पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे….. संजय राऊत

पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे….. संजय राऊत

95

पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे. असं मी मानतो. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ज्या गायींचा मृत्यू झाला. ते मृत्यू हे हत्याकांडच आहे. असं मी मानतो. असंही राऊत म्हणाले आहेत. एवढंच काय जर आत्ता मिंधे आणि भाजपाचं राज्य नसतं तर केवढा गहजब झाला असता. हिंदू रक्षा मोर्चा, गो माता बचाओ चा मोर्चा निघाला असता. मात्र कोल्हापुरात झालेल्या गायींच्या मृत्यूंनंतर काहीही झालं नाही.अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली आहे.मुख्यमंत्र्यांनी गायींना चारा खाऊ घातला होता….कोल्हापूरमधल्या कणेरी मठात मुख्यमंत्री गेले होते. त्यांनी हाताने चारा गायींना खाऊ घातला. त्यानंतर या गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मी काही कुणावर आरोप करत नाही. या घटनेत ५० गायींचा मृत्यू झाला. पालघरच्या साधूंचं हत्याकांड आणि गायींचं हत्याकांड हे मी सारखंच मानतो. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मिंधे गटासारखे चोर लफंगे आम्ही नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. डुप्लिकेट शिवसेनेने आम्हाला पदावरून काढून टाकलं तरी काही फरक पडत नाही. असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.