Home स्टोरी पाकिस्तानची एवढी भीषण आर्थिक आणि राजकीय स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती! शाहिद...

पाकिस्तानची एवढी भीषण आर्थिक आणि राजकीय स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती! शाहिद खाकान अब्बासी

69

मागील ७५ वर्षांच्‍याअधिक काळात पाकिस्‍तानमध्‍ये लष्‍कराने अनेक वेळा सत्तापालट करत आपलं वर्चस्‍व दाखवले आहे. याबाबत एका मुलाखतीमध्‍ये विचारले असता सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे वरिष्ठ नेते शाहिद खाकान अब्बासी यांनी सांगितले की, सध्‍या पाकिस्‍तानवर मोठे आर्थिक आणि राजकीय संकट आहे. देशातील व्‍यवस्‍था बिघडली तर मार्शल लॉ लागू होऊ शकतो. पाकिस्तानची एवढी भीषण आर्थिक आणि राजकीय स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. केवळ अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत सैन्याने सत्ता हस्तगत केली आहे. सध्‍याही अशीच परिस्‍थिती आहे, असा दावा त्‍यांनी केला. लष्‍कराने सत्ता ताब्‍यात घेतल्‍यास परिस्‍थिती आणखी बिघडेल.

अब्बासी यांनी इशारा दिला की, जर समाज आणि सरकारी संस्थांमधील संघर्ष खूप खोलवर गेला तर अशा परिस्थितीत लष्करही पाऊल उचलू शकते. अनेक देशांमध्ये असे घडले आहे की जेव्हा राजकीय आणि घटनात्मक व्यवस्था अपयशी ठरते, तेव्हा घटनाबाह्य उपाय केले जातात. अशा काळात पाकिस्‍तानमध्‍ये लष्कर मार्शल लॉ लागू करण्याच्या पर्यायावर विचार करत नाही कारण लष्कराने सत्ता हाती घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडेल, असा दावाही त्‍यांनी केला.

पाकिस्‍तानमध्‍ये लष्कर मार्शल लॉ लागू होण्याची शक्यता

राजकीय व्यवस्था हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचे या वेळी अब्बासी म्हणाले. १२ महिन्‍यांपूर्वी इम्रान खान यांची सत्ता जावून नवे सरकार सत्तेत आले. पण हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. देशासमोर मोठे आर्थिक संकट आहे. त्‍यामुळे आता लष्‍कर सत्तातरांचा निर्णय घेवू शकते. मात्र देशाच्‍या विकासासाठी राजकीय व्‍यवस्‍था हाच एकमेव मार्ग आहे, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.