Home स्टोरी पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह 

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह 

81

१३ सप्टेंबर वार्ता: निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह  पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले. त्‍यांचे हे वक्‍तव्‍य समोर येताच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माजी सैन्‍यप्रमुखांवर टीका केली. ‘सैन्‍यप्रमुख असतांना त्‍यांनी प्रयत्न करायला हवे होते’, असे ते म्‍हणाले.

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सिंह यांच्‍यावर टीका करत म्‍हणाले की, चीनने लडाखमध्‍ये घुसून आपली भूमी बळकावली आहे. इतकेच नाही, तर चीनने नुकताच अरुणाचल प्रदेशचा काही भाग आपल्‍या मानचित्रात दाखवला आहे. ही क्षेत्रे आधी आपल्‍या नियंत्रणाखाली घ्‍या.