Home स्टोरी पांग्रड येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लवू साळसकर यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव...

पांग्रड येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लवू साळसकर यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन.

245

सिंधुदुर्ग: पांग्रड नागामाचेटेंब येथे रविवारी श्री. सत्यनारायण महापूजेवेळी मधमाश्यांच्या हल्ल्यात लवू नारायण साळसकर वय वर्ष ७२ यांचे दुःखद निधन झाले.आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत साळसकर कुटुंबियांचे सांत्वन केले. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या श्री. सत्पुरुष मंदिराकडेही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. मधमाशांच्या हल्ल्यात अन्य ३० ते ४० ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांचीही विचारपूस आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांकडे केली.

यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख मंगेश मर्गज,आनंद मर्गज, शाखा प्रमुख विश्वनाथ मर्गज, आनंद कुंभार, गुंडू करंदीकर, सदानंद तावडे,भाऊ मर्गज, मनोहर डोंगरे, अनिल मर्गज, आबा माणगावकर, भिलारे बुवा, आनंद माणगावकर, मधुकर साळसकर, रोहन साळसकर, राजेश भरणकर, बाळा जांभवडेकर, गणेश पांग्रडकर,गणेश राणे, श्री. जाधव आदी उपस्थित होते.