Home स्टोरी परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा!

परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा!

157

मसुरे प्रतिनिधी: परब मराठा समाज, मुंबई यांच्या वतीने हीरक महोत्सवी वर्ष शुभारंभ निमित्त जागतिक महिला दिन आणि परब – ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा १९ मार्च २०२३ सकाळी १० वाजता श्री. शिवाजी नाट्य मंदीर, दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिन सोहळा निमित्त द. आर्ट स्टुडिओ डोंबिवली निर्मित मराठ मोळ्या महिलांचा बहारदार कार्यक्रम, परब ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा परब मराठा समाजाचे अध्यक्ष व माजी मंत्री अॅड. अनिल परब व समाजाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण द. परब, कार्याध्यक्ष जगदीश ज. परब, खजिनदार शरद परब, सरचिटणीस जी. एस. परब, चिटणीस शैलेंद्र लवू परब, महिला संघटक श्रीमती प्रतिक्षा प्र. परब, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.