Home राजकारण पब्लिक सबकुछ जानती है, म्हणत फडविसांचा विरोधकांवर हल्लाबोल…..

पब्लिक सबकुछ जानती है, म्हणत फडविसांचा विरोधकांवर हल्लाबोल…..

70

एमपीएससीच्या अभ्यासक्रमाचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मंजुरी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. पण या विषयावर मविआनं मोठं राजकारण केलं. पब्लिक सब कुछ जानती है, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधाकांवर हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?…. या ठिकाणी एमपीएससीचं आंदोलन सुरु होतं. काय दुटप्पी लोकं आहेत कधी कधी मला समजत नाही. एमपीएससीचा प्रश्न कोणाच्या काळात सुरु झाला? निर्णय कधी घेतला? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात. त्याकाळात आंदोलन झालं त्याला प्रतिसाद देखील दिला नाही. पण आमच्या सरकारच्या काळात पहिलं आंदोलन झाल्याबरोबरच आम्ही कॅबिनेटला सांगितलं आणि लगेच आयोगाला पत्र लिहिलं. पण आयोगानं सांगितलं हे शक्य नाही. तर आम्ही पुन्हा त्यांच्याशी संपर्क केला. पण आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की, “शिंदेंनी करुन दाखवलं आणि एमपीएससीच्या मुलांची जी मागणी होती ती मान्य झाली. पण मला आश्चर्य वाटतं यांचं सरकार निर्णय घेतं पण यांची तोंड उघडत नाहीत. आमचं सरकार आल्याबरोबरच जणू आम्हीच निर्णय घेतलाय असं सांगतात. पण पब्लिक सबकुछ जानती है, हे कसे आहेत? ते लोकांना माहिती आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसबा येथील सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला.