Home स्टोरी पडेल ग्रामपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन!

पडेल ग्रामपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन!

115

सिंधुदुर्ग: पडेल कॅन्टीन येथे आठवडा बाजार भरतो,रस्त्यावर बाजार भरत असल्याने टॅफीक जाम होतं. शिवाय एस्, टी स्टॅन्ड शेड मध्ये एसटी ची वाट बघत थांबलेल्या प्रवाशांची तारांबळ उडते. कारण प्रवासी शेडच्या समोरच व्यापारी आपली दुकाने लावतात. या सर्व गोष्टींचा विचार करून, पडेल ग्रामपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन केले होते. पडेल ग्रामपंचायत आठवडा बाजाराबाबत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतांना पडेल ग्रामपंचायतचे उपसरपंच आयु विश्वनाथ पडेलकर, सोबत सरपंच आयु भुषण पोकळे, विजयदुर्ग पोलीस निरीक्षक, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर वाडेकर, सानिका तानवडे, शरयु अनभवणे, तसेच बाजार समितीचे सदस्य; तमाम व्यावसायिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.