काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काही मोठी विधानं केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा मला जाणवलं की त्यांना अजिबात काही माहिती नाही. मी एकदा उदाहरण म्हणून सांगितलं की काश्मीरमधली खरी समस्या जमात आहे. त्यांना त्याची काही काळजीच नव्हती. त्यांनी म्हटलं मला त्यावर एक टिप्पण द्या. मी त्यावर २० पानांचं टिप्पण दिलं. पण त्यावर त्यांनी काहीच पावलं उचलली नाही. अमित शाहांनी त्यावर कारवाई केली”, असं मलिक या मुलाखतीत म्हणाले. जमात खूप शक्तीशाली आहे. सरकारमधले २०-३० टक्के कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत. पण मोदींना काहीच माहिती नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. काश्मीरच्या खऱ्या समस्येबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांना तर हेही माहिती नव्हतं की हुर्रीयत कसं काम करते. मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते”, असा दावाही त्यांनी केला.