Home स्टोरी नेरूर गोंधयाळे येथे व्यायामशाळेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

नेरूर गोंधयाळे येथे व्यायामशाळेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

176

भवानी मित्रमंडळाची व्यायामशाळेची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण….

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर गोंधयाळे येथे अद्ययावत अशी व्यायामशाळा उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण रविवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. भवानी मित्रमंडळाने आ. वैभव नाईक यांच्याकडे व्यायामशाळेसाठी मागणी केली होती. आ. वैभव नाईक यांनी हि मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे,कुडाळ नगरसेवक उदय मांजरेकर,सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,माजी उपसरपंच समद मुजावर,युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे, राजू गवंडे,अमित राणे,माजी उपसरपंच सुनील गावडे,ग्रा. प. सदस्य प्रभाकर गावडे,निकिता सडवेलकर,अरुणा चव्हाण,प्रवीण नेरुरकर,संतोष कुडाळकर,रुचा पावसकर, भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष धोंडी कांबळी,काका गावडे,प्रसाद गावडे,शरद मसुरकर,रामा कांबळी,अजित मार्गी,गणेश गावडे,दादा चव्हाण,बाबल गावडे, जगन्नाथ गावडे आदींसह नेरूर ग्रामस्थ उपस्थित होते.