सिंधुदुर्ग (राहुल सावंत) : बिळवस येथे आमदार वैभव नाईक यांनी विकास कामांसाठी बिळवस गावामध्ये भेट दिली.आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बिळवस गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली त्यामध्ये
१) ग्रामपंचायत इमारतीसाठी २०लक्ष
२)मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यासाठी १.५०,कोटी
३)जलमंदिर सुशोभीकरण ५लक्ष
४) जलमंदिर नजिक सव्रक्षण भिंत १०लक्ष
५)धाकु धाम ते सातेरी जलमंदिर १० लक्ष
६)जिल्हा वार्षिक मधून धाकु धाम ते जलमंदिर १०लक्ष
७)प्रजिमा ३२ ते सातेरी जलमंदिर ५ लक्ष आणि सर्वात मोठे काम म्हणजे BSNL tower इत्यादी कामे आमदार साहेबांच्या माध्यमातून बिळवस गावामध्ये करण्यात आली.
याबद्दल त्याचे ग्रामस्थांच्या वतीनं भावेश पालव यांनी आभार मानून शाल व श्रीफळ देऊन सूर्यकांत पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रलंबित रस्त्याची कामे लवकरात लवकर करू असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर,माजी नगरसेवक मंदार केनी,तालुका समन्वयक मंदार ओरोस्कर, मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर, उप तालुका प्रमुख युवासेना अमित भोगले, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर,तालुका समन्वयक पुनम चव्हाण, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखा प्रमुख रामचंद्र पालव, उपशाखा प्रमुख रमेश फणसे, युवासेना शाखा प्रमुख हेमंत पालव, यू.उपशाखा प्रमुख कुणाल पालव,भावेश पालव व बिळवस ग्रामस्थ व तमाम शिवसैनिक उपस्थित होते