Home स्टोरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मसूरे, पोईप, विरण येथे पोलीस संचलन!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मसूरे, पोईप, विरण येथे पोलीस संचलन!

96

मसुरे प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मसुरे बाजारपेठेसह विरण व पोईप बाजारपेठ येथे रविवारी सकाळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवान यांनी पथसंचलन केले. निवडणूक कालावधीत मतदारांनी बाहेर पडून निर्भयपणे मतदान करावे, पोलीस तसेच सुरक्षा दलाचे जवान सदैव आपल्या सहकार्यासाठी आहेत या साठीच बाजारपेठेतून तसेच इतर परिसरातून पथसंचलन करण्यात आले. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल चे निरीक्षक श्री. चौहान, २ पीएसआय, २० अंमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ४० जवान यावेळी उपस्थित होते.

मालवण पो.नि. प्रवीण कोल्हे म्हणाले, विधान सभेची निवडणूक जवळ आली असून निवडणूक काळात मतदारांनी न घाबरता बाहेर पडून आपले मतदान करावे. यावेळी पोलीस यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सदैव आपल्या मदतीसाठी आणि आपल्या सहकार्यासाठी, सुरक्षेसाठी साठी सदैव तत्पर आहेत या जनजागृतीसाठी हे पथसंचलन करण्यात आल्याचे ते म्हणाले.