Home स्टोरी निराधार जख्मी बांधवांवर प्रथमोपचार सेवा करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो…! संदिप...

निराधार जख्मी बांधवांवर प्रथमोपचार सेवा करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो…! संदिप परब,अध्यक्ष -जीवन आनंद संस्था.

117

पायाच्या जख्मेतील किड्यांनी विव्हळणारा नालासोपा-यातील निराधार बांधव समर्थ आश्रमात दाखल

 

वसई:  जखमांनी विव्हळणा-या रस्त्याकडच्या निराधार बांधवांवर प्रथमोपचार करताना आत्मिक समाधान आणि जीवन आनंद मिळतो.* असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी केले.

नालासोपारा पुर्व येथे तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत रुग्ण – विशाल भट (वय:४४) हा बांधव गेले कित्येक दिवस रस्त्याकडेला पायातील जख्मेने विव्हळत निराधार आणि सर्व दृष्टीने वंचित अवस्थेत जीवन कंठित होता. नालासोपारा येथील तृप्ती चौरसिया व भारत सिरसाट यांनी संदिप परब यांना जख्मांनी विव्हळणा-या बांधवाची माहिती दिली. त्यानंतर संदिप यांनी कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथून नालासोपा-यात धाव घेत बांधवाच्या पायाच्या जखमेतून बारीक मोठे सत्तर एक किडे काढले. मलम पट्टी केली. दाढी करुन स्वच्छ आंघोळ घातली.

 

यावेळी सहकारी – भाईदास माळी, गोविंद मार्गि, संपदा सुर्वे यांचेसह संस्थेचे हितचिंतक बबलु यादव यावेळी उपस्थीत होते. नालासोपारा तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांचे सहाय्य झाले.

जीवन आनंद संस्था गेली ११ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील आश्रम आणि शेल्टर होमद्वारे रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी कार्यरत आहे.

कोणाही व्यक्तीला विनाकारण रस्त्यावर निराधार व वंचित जीवन जगावे लागू नये. निराधार वंचिताना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे. ज्यांचे या जगात कोणी नाही. त्यांचेसाठी जीवन आनंद संस्था आहे.असे ब्रीद घेवून संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहे.