शिडवणे प्रतिनिधी: निपुण भारत अभियान अंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक ग्रामसभा संपन्न झाली. प्रारंभी सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक नलावडे यांनी प्रास्ताविक केले. शाळापूर्व शिक्षण , अंगणवाडीतील वातावरण , शैक्षणिक सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेची शैक्षणिक सद्यस्थिती , इयत्तावार अध्ययन स्तर , अध्ययन निष्पत्तीबाबत शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे व शिडवणे कोनेवाडीचे उपशिक्षक मंगेश खांबळकर यांनी माहिती दिली. शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा व भौतिक विकास आराखडा इत्यादी माहिती सांगण्यात आली. शाळेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक सहाय्याविषयी चर्चा करण्यात आली.निपुण भारत अभियानाकडून अपेक्षा व माहिती देण्यात आली. सरपंच रविंद्र शेट्ये यांनी शैक्षणिक ग्रामसभेला मार्गदर्शन केले. बालसभा व पालकसभेत मुलांनी केलेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. त्यावेळी शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ग्रामसेवक नलावडे , ग्रामपंचायत सदस्य कोमल शेट्ये , दयानंद कुडतरकर , शांताराम धुमाळ , सुप्रिया पांचाळ , सुप्रिया पाष्टे , स्मिता टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , मंजुळा गुंडये , तारीफ शेख , आशा सेविका आरती शिंदे , अंगणवाडी सेविका पाटणकरबाई , लवेश कासार्डेकर , सेजल भोवड , समृद्धी पाटणकर , चिन्मय पाटणकर , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि शिडवणे गावातील बहुसंख्य पालक , ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.