Home स्टोरी नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

99

४ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील चित्रनगरीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती दिली. देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू त्यांच्यावरील कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे झाला. त्यांच्या कर्जत येथील ४३ एकरच्या स्टुडिओवर असलेले १८२ कोटी रुपयांचे कर्ज व्याजामुळे २५२ कोटी रुपये झाले. या प्रकरणाच्या काही ‘ऑडिओ क्लीप’ उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत व्याजाचे दर, कर्जवसुलीची पद्धत याविषयीची चौकशी करण्याची मागणी केली.काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही याविषयीची चौकशीची मागणी करत त्यांचा स्टुडिओ शासनाने कह्यात घेऊन विकसित करावा, अशी मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘नितीन देसाई यांनी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे काम केले. अशा कला दिग्दर्शकाचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्यावरील कर्जामुळे त्यांचा स्टुडिओ घेण्यासाठी कुणी दबाव आणला होता का? याविषयी सरकार चौकशी करेल. त्यांची आठवण म्हणून त्यांचा स्टुडिओचे संवर्धन करता येईल का? याविषयी कायदेशीर गोष्टी पडताळून निर्णय घेण्यात येईल’,