Home स्टोरी नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

266

मसुरे प्रतिनिधी: नारिंग्रे येथील भूतवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्या वतीने नारिंग्रे गावातील अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. नारिंग्रे गावातील आबासाहेब राणे विद्या मंदिर येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळा, तसेच भूतवाडी येथील अंगणवाडी व दत्त विद्या मंदिर आणि सडावाडी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळा अशा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी मुंबईच्या मंडळाचे विश्वस्त रघुवीर वायंगणकर, अध्यक्ष प्रकाश द. घाडीगावकर, जयवंत मेस्त्री, पोलीस पाटील संदीप राणे सुनील मेस्त्री, प्रदीप घाडी, विनय घाडी, मुकेश घाडी, भरत पाटील, मंगेश घाडी, बाळा पाटील, विलास वायंगणकर आदी उपस्थित होते. यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रास्तविक रघुवीर वायंगणकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दत्ताराम घाडीगावकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जयवंत मेस्त्री यांनी केले. मुंबईच्या मंडळाचे नंदकुमार दत्ताराम घाडीगावकर यांच्यासह अनेकांचे आभार मानण्यात आले.