वेंगुर्ले: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नं. १ प्रशालेच्या शतक महोत्सवाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आसोलीचे सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, ग्रामसेवक श्री.पोवार, अध्यक्ष उदय धुरी,सदानंद गावडे, आदी उपस्थित होते. या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ग्रामस्थ आणि पालकवर्गाचीही उपस्थिती समाधानकारक होती. व्यवस्थापन समिती अध्यक्षा संपदा नाईक यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तम केले.
मुख्याध्यापक शरद पवार आणि शतक महोत्सव समितीचे सचिव विजय धुरी यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह संजय विनायक गावडे यांनी संपूर्ण शतक महोत्सवासाठी आर्थिक आणि अन्य प्रकारेही मदत केलेल्या सर्व आसोलीची मुंबईकर मंडळी, ग्रामस्थ,सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक,पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केले.