Home राजकारण नांदेडमध्ये मोठी राजकीय घडामोड; BRS पार्टीमध्ये या माजी आमदारांचा प्रवेश

नांदेडमध्ये मोठी राजकीय घडामोड; BRS पार्टीमध्ये या माजी आमदारांचा प्रवेश

203

नांदेड येथील सभेला मोठी गर्दी झाली होती. के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली. तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयाला हात घातला.

नांदेड : महाराष्ट्रातील तीन माजी आमदार (Former MLA) यांनी मुख्यमंत्री के सी आर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पार्टीमध्ये प्रवेश केला आहेत. याशिवाय राज्यातील महत्त्वाचे नेते हेही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यामुळं भारत राष्ट्र समितीची राज्यात एंट्री झाली आहे. गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम (Deepak Atram), उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे राजन कोडक, संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे व ढोलीराम काळदाते या महत्तवाच्या राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 5 झेडपी सदस्यांनी BRS पक्षात प्रवेश केला. यासाठी राज्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आपल्या पक्षाचा प्रवेश केला.

शेतकरी, कामगार केंद्रबिंदू

बिहारमधून त्यांनी BRS ला देशात नेण्यास सुरुवात केली. आज नांदेडमधून त्यांनी महाराष्ट्रात एंट्री केली. त्यामुळं राज्यातील राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी देशपातळीवर पक्ष नेण्याचे आवाहन केलं.