Home स्टोरी नवाब मलिक यांनी २ नोव्हेंबर २०२१ रोजी वानखडेंच्या लाइफस्टाइलबद्दल केले होते आरोप….

नवाब मलिक यांनी २ नोव्हेंबर २०२१ रोजी वानखडेंच्या लाइफस्टाइलबद्दल केले होते आरोप….

77

१५ मे वार्ता: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवेतील(आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात आता त्याच प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन आर्यन खान ड्रग्स प्रकरणी नवनवे खुलासे केले जात होते.

१. “ड्रग्ज प्रकरणात वसुली मालदीव येथे झाली होती. त्यांनी दुबई आणि मालदीव मधील दोघांचे फोटो टाकले होते. समीर वानखेडे मालदिवला आणि त्यांची बहिण दुबईमध्ये होत्या, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

२. इतक्या लोकांना मालदीवला जाण्यासाठी २० ते ३० लाखांचा खर्च येतो. एनसीबीच्या दक्षता विभागाने याचा खर्च कोणत्या खात्यातून करण्यात आला याची चौकशी करायला हवी, असे नवाब मलिक म्हणाले होते.

३. समीर वानखेडे सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप त्यांनी केला होता.

४. समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते नेहमी बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत ५० हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरु होते, असे मलिक म्हणाले होते.

५. वानखेडेंच्या हातातील घड्याळे दररोज बदलतात, ज्यांची किंमत २० हजारांपासून सुरु होते, ती एक कोटींपर्यंत किमतीची आहेत, असेही मलिक यांनी म्हटले होते.

६. एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल, असेही मलिक म्हणाले होते आणि त्यांनी अनेक फोटो शेअर केले होते.

७. या सर्व काळात समीर वानखेडेंनी जशाप्रकारचे कपडे घातले आहेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? असा सवाल नवाब मलिकांनी केला होता.

८. समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी. समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.