सावंतवाडी: नळ पाईपलाईनसाठी रस्त्याला मारलेले आडवे चर तातडीने बुजवण्याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांच लक्ष वेधलं होतं. त्यावेळी चर बुजवण्यात येतील असं आश्वासन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिलं होतं. त्याप्रमाणे हे चर बुजविण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. मंगळवारी हे चर बुजविण्यात आले. याबद्दल युवा रक्तदाता संघटनेकडून मुख्याधिकारी सागर साळुंखे व पाणी पुरवठा विभागाचे आभार मानण्यात आले आहेत.शहरात पाणी पुरवठा विभागाने घरगुती कनेक्शन व नळ पाईपलाईन दुरुस्तीसाठी हे चर मारले होते. हे चर अपघातास कारणीभूत ठरत होते. याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांच लक्ष वेधलं होत. अखेर हे चर बुजविण्यात आल्यानं शहरातील नागरिक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.