सिंधुदुर्ग: धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची नाटकाच्या माध्यमातून सावंतवाडी येथील माजगाव मधील कासार वाडीत त्यांच्या कार्यक्रमात विटंबना केली गेली. त्यासंदर्भात शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे साहेबांना ही बाब निर्दशनास आणून दिल्यावर आज शनिवार दिनांक २५ मार्च ला सायंकाळी ७ वाजता आयोजकांना बोलवून त्यांच्या कडून माफीनामा लिहून घेऊन पुढच्या वेळेस धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास पराक्रम आणि त्यांनी दिलेल्या बलिदानावर नाटक त्यांच्या वाडीतील गुडी पाडव्याच्या वाडीतील कार्यक्रमात ठेवणार आणि ज्या शिवप्रेमीने ज्यादिवशी हे नाटक चालू असताना चुकीच्या इतिहासावर आवाज उठवल्यामूळे कळत नकळत धक्काबुकी झाली त्यांचा सत्कार करणार. असे आयोजकांनी आश्वासन दिले. PI श्री मेंगाडे साहेबांच्या समक्ष आणि झालेल्या कळत नकळत चुकीची माफी मागितली.
Home क्राईम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची नाटकाच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारबाबत शिवप्रेमी सिंधुदुर्ग...