Home स्टोरी धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी रद्द, पुढील तारीख लवकरच होणार...

धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी रद्द, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर

46

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सोमवारी होणारी सुनावणी रद्द झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सोमवारच्या कामकाजात शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नाही. धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीची पुढची तारीख लवकरच जाहीर होईल.एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे, सोबतच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी २४ एप्रिल ही तारीख मागच्या वेळी ठरली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीमध्ये शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणाचा समावेश नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतिम निकालाप्रमाणे धनुष्यबाण हे ठाकरेंऐवजी शिंदे गटाला दिलेले आहे. शिवसेना हे नावसुद्धा शिंदे गटालाच दिले गेले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.