Home क्राईम धक्कादायक : १४ वर्षीय मुलीचे बाप-बेट्यानी केले लैंगिक शोषण. म्हसळा शहरा जवळील...

धक्कादायक : १४ वर्षीय मुलीचे बाप-बेट्यानी केले लैंगिक शोषण. म्हसळा शहरा जवळील खारगांव बुद्रुक येथील घटना.

386


म्हसळा प्रतिनिधी: म्हसळा शहरा जवळील खारगांव बुद्रुक येथील दिपक नागेश पाटील वय ५१ आणि सिध्दू दिपक पाटील वय २३ यानी आपल्याकडे घर कामाला आसलेल्या १४ वर्षीय आदिवासी आल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याची फिर्याद मुलीने दिलयाने म्हसळा पोलीसांत गुन्हा नोंदविला पोलीसानी गु.रजी. नं. ४० / २०२३ भा.द.वि.क्रं ३७६,(f)(i)(j)(n) ५०६, बाल लैंगीक  आत्याचार संरक्षण (Pocso) अधिनियम २०१२, ४,६, ८,१०,१२ प्रमाणे नोंद केली आसल्याचे म्हसळा महीला पोलीस सब इन्स्पेक्टर वाय.पी. बांडे यानी सांगितले.


१४ वर्षीय आदिवासी आल्पवयीन मुलीवर  लैंगिक आत्याचार ६ जून २०२२  ते  २८ मार्च २०२३ या काळात झाले. जबरदस्तीने बाप बेटयाने शारीरीक संबध ठेवले होते असे पीडीत अल्पवयीन मुलीने पोलीस जबानीत सांगितले.
“लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने नोव्हेंबर २०१२मध्ये बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र या कायद्याबद्दल अद्यापही लोकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे अशा घटना घडूनही अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे का येत नाही ह्या समस्या स्थानिक पोलीसाना भेडसावत आहेत”
“आज म्हसळा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांत पोलीसानी सखोल. पारदर्शक तपास करावा आणि अॅट्रासीटी दाखल करून तपास सुरू व्हावा ,जरुर वाटल्यास आंदोलन छेडते जाईल असे शांतीदूत परिवार संस्था पुणे, येथील राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव यानी सांगितले. सदर घटनेचा तपास उप- विभागीय पोलीस आधिकारी श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नी संदीपान सोनावणे करीत आहेत.दोनही आरोपीना पोलीसानी अटक केली असून १ एप्रिल २०२३ पर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याचे समजते.