दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. २५ वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण त्यांना रस्ते बनवायचेच नव्हते. वर्षानुवर्ष एकाच रस्त्यावर पैसा खर्च केला जात होता. हे धोरणच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच रस्ते काँक्रिटचे करायचे ठरवलं. एकदा रस्ता झाला तर त्यावर ५० वर्ष खड्डा पडता कामा नये असं काम सुरू केलंय. येत्या दोन वर्षात खड्डे मुक्त मुंबई होणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकतं तर २५ वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये. ज्या प्रकल्पातून माल मिळतो तेच प्रकल्प हाती घेण्याचं यांचं धोरण होतं. पण आम्ही ते बदलून टाकलं आहे, असं सांगतानाच मुंबईची सफाई सुरू आहे. अनेक जागा स्वच्छ केल्या जात आहेत. लोकांना स्वच्छ हवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावा हा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.