सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुका पत्रकार समितीची निवडणूक आज गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी दोडामार्ग येथे झाली. दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्ष पदासाठी सुहास देसाई विरुद्ध संदीप देसाई व पराग गावकर या तिघांमध्ये हि निवडणूक झाली. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती निवडणुकीत संदीप देसाई यांना बहुमत मिळाले. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी संदीप देसाई, उपाध्यक्षपदी साबाजी सावंत, शंकर जाधव, सचिवपदी गणपत डांगी, खजिनदारपदी रत्नदीप गवस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी तेजस देसाई, समीर ठाकूर, राजेश देसाई लवु खरवत, प्रभाकर धुरी भिकाजी गवस आधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत यांनी काम पाहिले.