Home राजकारण देशात बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत! शरद पवार…

देशात बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत! शरद पवार…

117

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून सध्या राजकारण पेटलं आहे. याची सुरूवात झाली ती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने ठोठावलेल्या २५ हजारांच्या दंडाच्या बातमीमुळे. माहितीच्या अधिकारात अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती विचारली होती. जी मिळाली नाही, त्यानंतर केजरीवाल माहिती आयुक्तांकडे गेले. हे प्रकरण सुरतच्या कोर्टात गेलं. ज्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना दंड ठोठावला. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. देशात बेरोजगारीचा प्रश्न असताना डिग्रीचं कसलं घेऊन बसलात ? असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?
आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची डिग्री काय? हे जास्त महत्त्वाचं आहे का? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत या राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डिग्री हा महत्त्वाचा प्रश्न नाही असं म्हटलेलं असताना संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीची मागणी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीत मतमतांतरं दिसून येत आहेत.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?

लाखो, कोट्यवधी डिग्रीधारक बेरोजगार आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री विचारली जाते आहे. ती त्यांनी दाखवली पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा करीश्मा निर्माण केला तो डिग्रीच्या जोरावर केला का? त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा आपला करीश्मा निर्माण केला आहे. त्यामुळेच भाजपाचा विजय झाला त्याचं सगळं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जातं. डिग्रीवर काय? आत्तापर्यंत जे जे देशाचे पंतप्रधान झाले त्यांना बहुमताचा आदर करूनच निवडलं गेलं आहे. असं मत अजित पवार यांनी मांडलं आहे.