Home स्टोरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच

147

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ही सरासरी १० हजाराने वाढत आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार कोरोना रुग्ण सापडले. देशात गेल्या २४ तासांत ५४५ रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. आज ६५५ जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात ८ हजार २७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ५५ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई आज १४१ रुग्ण सापडले तर एका तरुणाचा मृत्यू झाला. ३३ वर्षांच्या या तरुणाला टीबीचा दीर्घकालीन आजार होता. दिवसभरात १८१ जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती १ हजार ३३६ वर पोहोचली आहे.