Home स्टोरी देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ

देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ

58

महाराष्ट्र: देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आता कोरोना रुग्ण दुप्पट होण्याची वेळ सात दिवसांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या सात दिवसांत २९ वरून ३६ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. केरळ, गोवा आणि दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन प्रकरणांची संख्या तुलनेने जास्त आहे. या राज्यांमध्ये काही आठवड्यांपासून व्हायरस पसरत आहे.