Home स्टोरी देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन गुजरातला जाणार…!

देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन गुजरातला जाणार…!

247

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत शिवसेनेनेवर, ठाकरे परिवारावर टीका करणारे प्रकल्प तसेच दिनू मोर्या सकट ला गुजरात मध्ये जाणार का?

गतिमान सरकार चे गतिमान कार्य…!  युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचे टिकास्त्र.

कुडाळ: देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुजरातला जात आहे आणि तो पण केंद्रीय उद्योग मंत्र्यांच्या जिल्ह्यातलाच प्रकल्प, रोजगार गुजरात मध्ये जात असेल तर यांच्याकडुन अपेक्षा तरी काय म्हणुन ठेवावी, सिंधुदुर्गच्या विकासाला खीळ बसविण्याचे प्रयत्न भाजप कडून होत आहे. असं युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे

जिल्ह्यातला रोजगार पळवला जात आहे आणि सत्ताधारी यावर एक शब्द पण काढत नाहीत. जिल्हा विकासाकडे नाय तर भकासाकडे नेण्याचे काम भाजप च्या माध्यमातून होत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी आता भाजप ला गुजरात मध्येच पाठवलं पाहिजे. एकही मंत्री यावर बोलायला तयार नाही. किंवा भाजपच्या माध्यमातून एकही याबाबत प्रतिक्रिया नाही. हे मोदी सरकार नाही तर ठोकी सरकार आहे. अशी टीका युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी सरकारवर केली आहे. तसेच सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत शिवसेनेनेवर, ठाकरे परिवारावर टीका करणारे प्रकल्प तसेच दिनू मोर्या सकट ला गुजरात मध्ये जाणार का? असा प्रश्न ही युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी उपस्थित केला आहे.