सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची मुलाखत एका वृत्तवाहिनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी भारतातील न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही, असे रोखठोक सांगितले. त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयोगाबाबत निकाल दिलेला आहे. हा निकाल देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. न्यायव्यवस्थेवर दबाब असतो का? या प्रश्नावर सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी सांगितले की, माझ्या २३ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कुणीही मला कुठल्याही खटल्याचा निकाल कसा द्यावा? याबाबत सांगितलेलं नाही. याचा अर्थ न्यायव्यवस्था स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यावर कोणाचाही दबाब नाही. कायदेमंत्री किरेन रिजिजू आणि आमच्या मतांमध्ये अंतर आहे. असं डी.वाय.चंद्रचूड यांनी सांगितले.न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. न्यायालयात येणारी प्रकरणे भारतीय जनतेचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वासही दर्शवतो. जिल्हा न्यायालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यात सुधारणेची गरज आहे.आमचं न्यायव्यवस्थेचे मॉडेल हे ब्रिटिशांकडून मिळालेले आहे. ते वसाहतवादी मॉडेलवर आधारित आहे. त्यात बदलाची गरज आहे. पुढच्या काळात आपल्याला भारतीय न्यायव्यवस्थेला आधुनिक तंत्राने समृद्ध केलं पाहिजे.असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.