Home स्टोरी देशाच्या सीमा बळकट केल्या जात आहेत ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर.

देशाच्या सीमा बळकट केल्या जात आहेत ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर.

106

८ ऑगस्ट वार्ता: परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सांगितले की, भूतान आणि आसाम यांना जोडणार्‍या रेल्वे ‘लिंक’साठी चर्चा चालू आहे. तसेच म्यानमारच्या सीमेविषयीही चर्चा चालू आहे. देशाच्या सीमा बळकट केल्या जात आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सांगितले. भूतान आणि चीन यांच्यात चर्चा चालू आहे आणि या चर्चेच्या २४ फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. ‘या चर्चेचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो’, याविषयी आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते पुढे म्हणाले.एस्. जयशंकर यांनी चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात चर्चा थांबलेली नाही. याविषयी लवकरच बैठक होणार आहे. गेल्या ३ वर्षांत सीमेवरील तणाव अल्प झाला आहे. वर्ष २०१४ नंतर जेव्हा भारताने सीमेवरील परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यास आरंभ केला, तेव्हा चीननेही या परिसरात त्याच्या सैनिकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत भारताशी स्पर्धा केली, असेही एस्. जयशंकर यांनी सांगितले.