सिंधुदुर्ग: देशभक्त शंकरराव गवाणकर बी. एम. एस.कॉलेजमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत व प्राचार्य यशोधन गवस यांनी घातला व त्यांना अभिवादन केले. यावेळी प्राध्यापक एल पी पाटील, साईप्रसाद नाईक, अस्मिता गवस, आनंद नाईक आधी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट सावंत म्हणाले की,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी जे संविधान लिहिले ते संविधान कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वाचायला हवे आणि ते आत्मसात करायला हवे. प्रत्येक नागरिकाला कायदा समजायला हवा आणि त्यासाठी कायद्याचे ज्ञानही हवे. शिक्षण संघटन आणि संघर्ष करण्याची ताकद तुमच्यात यायला हवी आणि हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार अभ्यासा.
यावेळी प्राचार्य यशोधन गवस व प्राध्यापक श्री पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन श्री पंडित यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.