Home राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झालो! बच्चू कडू

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झालो! बच्चू कडू

146

२३ ऑगस्ट वार्ता: शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नेमके काय ठरले होते? याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले आमदार बच्चू कडू?                        मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झालो असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये येथे आयोजित दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.