Home स्टोरी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी! (दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी)

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी! (दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी)

66

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साथियेत्या ।। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ।। असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।। ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी।।

अभंगाचा भावार्थ:- देवाच्या दारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरि हरि म्हणा, संसारात राहून नामाचा उच्चार जिव्हेला वेग देऊन करा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचेप्रमाण देऊन सांगतात की, तुम्हांला चारी मुक्ती साध्य होतील, अगणित पुण्याची प्राप्ती होईल, वेदशास्त्रे हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील व द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण, ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले, त्याप्रमाणे परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करील.

जय जय राम कृष्ण हरी